Wednesday, 3 September 2014

दोस्ती होती है दिलों के चाहने पर, जबरदस्ती दोस्ती करना मेरी आदत नही..

किसी को तकलीफ देना
मेरी आदत नही,
बिन बुलाया मेहमान बनना
मेरी आदत नही...!

मैं अपने गम में रहता हूँ
नबाबों की तरह,
परायी ख़ुशी के पास जाना
मेरी आदत नही...!

सबको हँसता ही
देखना चाहता हूँ मै,
किसी को धोखे से भी
रुलाना मेरी आदत नही...!

बांटना चाहता हूँ तो बस
प्यार और मोहब्बत,
यूँ नफरत फैलाना
मेरी आदत नही...!

ज़िदगी मिट जाये
किसी की खातिर गम नही,
कोई बद्दुआ दे मरने की
यूँ जीना मेरी आदत नही...!

सबसे दोस्त की हैसियत से
बोल लेता हूँ,
किसी का दिल दुखा दूँ
मेरी आदत नही...!

दोस्ती होती है
दिलों के चाहने पर,
जबरदस्ती दोस्ती करना
मेरी आदत नही..!

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!

हे वैभव ज्याच्याजवळ आहे..तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!

कलीयुगाचे पर्व आहे..,
प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!


मी आहे तरच सर्व आहे...,
नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!

अरे वेड्या..!
कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,
आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे...!!!

प्रेमाने जोडलेली चार माणसं व
त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द

हे
वैभव ज्याच्याजवळ आहे..,
तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!

मोठ्या व्यक्तींचे महत्वाचे विचार

 नक्की वाचा...आणि शेअर करा!!!

1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
- नारायण मूर्ती

2) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू
शकणार नाही. पण स्वतःला
ओळखून स्वतःला, स्वतःसाठी,
स्वतःकडून नेमके काय हवे आहे;
हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
-- विश्वनाथन आनंद

3) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.** *
-- धीरूभाई अंबानी

4) पैसा हा खतासारखा आहे.
तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. *
-- जे. आर. डी. टाटा

5) फोटोग्राफरच्या एका "क्लिक' मुळे जगणे चिरकाल होते.**
-- रघू राय


6) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले,
तर त्याचा परिणाम चांगला होतो.*
- बिल गेट्स

7) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *
- कल्पना चावला


8) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत
बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या
बदलाचा भाग व्हा.*
-- बराक ओबामा

9) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ
मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
-- आयझॅक न्यूटन

बायकोच्या मनात काय आहे ते कुठल्या नव-याला कधी कळल आहे का?

🌺समस्त बायकांसाठी......🌺🌺🌺

बायकोच्या मनात काय आहे
ते कुठल्या नव-याला
कधी कळल आहे का?👼😏

पण नव-याच्या मनात😇👈
काय आहे ते प्रत्येक
बायकोला मात्र कळत💁

येणा-या रविवारी
नव-याला माहित नसत😳
तो काय करणार आहे
पण बायकोला मात्र
सगळा प्रोग्राम माहित असतो🍻🍸🍹🍗🍵☕

बायको म्हणजे
नव-याची पर्सनल
डायरीच असते📝
कधी काय हव, काय नको
कोणाचा वाढदिवस आहे,
कोणाच लग्न आहे ,
सगळ तिच्या डोक्यात
'सेव' केलेल असत
ते सुध्दा 'रिमांइडर सकट'👈👈

चोराची प्रत्येक चाल जशी
पोलिसाला कळते,
तस नव-याची बायकोला.
तिच्या कड़े सर्व पुरावे असतात.
पण जो पर्यंत नवरा काही
बोलत नाही, तो पर्यंत
बायकोमात्र गप्प असते.🙍
एकदा का सापडलात
कि मग मात्र तुमची ख़ैर नसते.

हवामान खात्यापेक्षा
बायको दोन पावल पुढेच असते.
नव-याच्या चेह-यावरूनच😊😣😒😭😂
तिला भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ
सगळ्याची कल्पना येते.
हो , आणी येणा-या प्रसंगासाठी
बाई अगोदरच सज्ज असते.

कधी नव-याला प्रेमाने गोंजारायच,😘
आणी कधी दम द्यायचा,😡
तर कधी अश्रुंच ब्रम्हाअस्त्र काढायच😭
हे ती जस अभिमन्यु
आईच्या पोटी चक्रव्युह भेदायला शिकला,
तस तिही शिकलेली असते.

पण बायको असते
म्हणून प्रत्येक नवरा
संसाराचा गाढा ओढत असतो.
बायको म्हणजे संसाररुपी शरीराच
ह्रदय असते, ती जोपर्यंत
असते तोपर्यंत संसार, 👪👫
'संसार' असतो
जवळ असली की वसंत फुलतो,
दुर असली कि शिशीर बोचतो.

वेळ प्रसंगी नव-याला
फुलाप्रमाणे जपते,
समईतल्या वाती सारखी
नव-यासाठी जळते,
संकटामध्ये कधी दुर्गा होते,
तर मुलांनसाठी सरस्वती होते,
घरच्यांसाठी अन्नपूर्णा होते,
लक्ष्मी होऊन तीळ तीळ पैसा जमवते.
शेवटी यमालाही परत फिरायला👺
भाग पाडणारी बायकोच असते.
Dedicated to all the lovely ladies and their dedicated husbands.

दररोज फक्त एवढेच करा!

दररोज फक्त एवढेच करा!
दुःख ----- Delete
आनंद ----- Save
नाते ----- Recharge
मैत्री ----- Download
शत्रुत्व ----- Erase
खरे ----- Brodcast
खोटे ----- Switch Off
तणाव ----- Not Reachable
प्रेम ----- Incoming
दुस्वास ----- Outgoing
हास्य ----- Inbox
अश्रू ----- Outbox
राग ----- Hold
स्मितहास्य ----- Send
मदत ----- Ok
मन ----- Vibrate
मग बघा आयुष्यातील "RING TONE
किती मधुर वाजते ते......:):):):)

आदर्श जीवन जगण्यासाठी

आदर्श जीवन जगण्यासाठी

1) चूक झाली तर मान्य करा.
2) समोरच्याचे मत विचारात घ्या.
3) चांगल्या कामाची स्तुती करा.
4) आभार मानायला विसरू नका.
5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
6) सतत हसतमुख रहा.
7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
11) कृती पुर्व विचार करा.
12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
13) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
15) नेहमी सत्याची कास धरा.
16) इतरांना चांगली वागणूक द्या.
17) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
18) विचार करून बोला.

परिस्थिती पचवून,परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत!

निवड...

एक अप्रतिम सुन्दर लेख....प्रत्येकाने जरुर वाचावा असा.......कृपा करून वेळ
काढून वाचा.. आवडल्यास शेअर करावा.

शाळेने पत्रक काढलं,' यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक
मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे
ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल !


आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे,
खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक
विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री
केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात .

गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण
गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन - चार दिवस नुसता अंदाज
बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे ;पण लहान
मुलांमधे अडचणीचं .शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची
आणि गाडीनेच घरी जायची.

मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना
विचारलं ," मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"

क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले," सर आपल्या वर्गातला तो
मयूर आहे नं, तो सर्वात गरीब आहे."

मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता.
"कशावरून म्हणता?"
" सर. त्याचा सदरा दोन- तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय. त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला
शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा
, मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही
डबा उघडतो . तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो.सर,ती भाकरीही
कालचीच असते.भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब
आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी ."

मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली . पण मला ते ऐकू येणे
शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले
द्यावेत? कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं
होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही
मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं,
" पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर.असं अक्षर असावं हे माझे स्वप्न
होते.उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि
अखेर करून लिहिलेली उत्तरे........." चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत
यॆई.
माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे
.

असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये,
या गोष्टीचीच मला खंत वाटली .जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि
मला त्याचा पत्ताही नसतो......अरेरे!..., मी खूप कमी पडतोय. मयूर , गेल्या सहलीला
आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती ; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण
त्याला साधं विचारलंसुद्धा नाही.

असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ
पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला
मुकला होता तो.
हा आनंद मी हिरावला होता.यादीत मयूरचे
नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच
नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!

शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं
नाव.
आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी.आता शंकाच नव्हती.त्याची गरीबी
बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले
नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन
टाकले

'मयूर जाधव, सातवी अ,अनुक्रमांक बेचाळीस'

डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले,

" खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची
फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश...इत्यादी सर्व या रकमेत सामावणार
आहे."

मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं,
" सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं
तर-मयूर जाधवच आहे!"

एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो.मयूरला मिळणारी
मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे
रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.

दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो.
देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता.त्यावर 'गरीब
असूनही आदर्श ' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो
होतो .इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला.

त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता.
राग आवरावा तसा करारी चेहरा...

" सर, रागवू नका; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका."

" अरे, काय बोलतोयस तुला समजतय का?"

" चुकतही असेन मी . वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव...!!"

त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा
,डोळ्यातलं पाणी......मला कशाचाच काही अर्थ लागेना.मी ज्याचं अभिनंदन करायच्या
तयारीत,तो असा.....?

" सर,मला मदत कशासाठी? गरीब म्हणून?
मी तर श्रीमंत आहे."

त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती.येतानाच त्याचे अनवाणी
पाय पाहिले होते.शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत
प्रथमच आली होती.

"अरे पण....?"

"सर,विश्वास ठेवा.मी श्रीमंत आहे.कदाचित सर्वात श्रीमंत असेन...सर,मी गरीब
आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले
तर मी आजारी पडेन आज."

अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो,

" ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत,नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे
काय?"

" सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा,
कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत.पुस्तकं मी Second Hand वापरतोय
...खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना?
मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का? सर,माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी
पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे
मलाच आहेत.सर...सर,सांगा ना,मी गरीब कसा?"

मयूर मलाच विचारत होताआता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न
थरारत होतं.

" खरयं मयूर. पण तुला या पैशाने मदतच
......."


" सर , मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फ़ी देतीये
म्हटल्यावर, मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन! "

"म्हणजे?"

" वडील घरांना रंग द्यायचे काम करतात
.Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर
नेतात.
चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो.
सर, संचयिका आहे ना शाळेची,त्यातलं माझं पासबुक बघा.पुढच्याही वर्षाची फ़ी
देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले
दिसते
.....म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं.
पण सर,मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगले काम करतात. काम म्हणज
कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात.आई धुणं-
भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते.सर,वेळ कसा जातो,दिवस
कसा संपतो ते कळतच नाही....शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त
वाचली आहेत.तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर,माझ्या
घरी याच तुम्ही,माझ्याकडे पु.ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे.
........सर,आहे ना मी श्रीमंत?"

आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता.सर,
शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो.रात्री देवळात
होण्या~या भजनात मीच पेटीची साथ देतो.भजनीबुवा किती छान
गातात! ऐकताना भान हरपून जातं
."

त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता.अभावितपणे मी विचारलं,"

व्यायामशाळेतही जातोस
?"

"सर,तेवढी फ़ुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास
बैठका काढतो ."

अंगावर एक थरार उमटला...कौतुकाचा.

" मयूर मित्रा ,मला तुझा अभिमान वाटतो.तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात
आहे त्याचा .."

" म्हणूनच म्हणतो सर......!"

" हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली
; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान
मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी........."

" सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाउ द्या . मी लिंकनचं,सावरकरांचं चरित्र
वाचलं ,हेलन केलरचं चरित्र वाचलं.सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट
करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड
मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं
राहूनच
जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर.....प्लीज.....!"
वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं , कलेच्या स्पर्शानं ,कष्टानं....... त्याच्या
वाणीला प्रगल्भतेची खोली होती,संस्कारामुळे नम्रतेची झालर होती . आता मला माझ्या
समोरचा मयूर जाधव स्पष्ट
दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले
होते.

शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून,
परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत!

क,ख,ग क्या कहता है जरा गौर करें....

क,ख,ग क्या कहता है जरा गौर करें....
••••••••••••••••••••••••••••••••••••
क - क्लेश मत करो
ख- खराब मत करो
ग- गर्व ना करो
घ- घमण्ड मत करो
च- चिँता मत करो
छ- छल-कपट मत करो
ज- जवाबदारी निभाओ
झ- झूठ मत बोलो
ट- टिप्पणी मत करो
ठ- ठगो मत
ड- डरपोक मत बनो
ढ- ढोंग ना करो
त- तैश मे मत रहो
थ- थको मत
द- दिलदार बनो
ध- धोखा मत करो
न- नम्र बनो
प- पाप मत करो
फ- फालतू काम मत करो
ब- बिगाङ मत करो
भ- भावुक बनो
म- मधुर बनो
य- यशश्वी बनो
र- रोओ मत
ल- लोभ मत करो
व- वैर मत करो
श- शत्रुता मत करो
ष- षटकोण की तरह स्थिर रहो
स- सच बोलो
ह- हँसमुख रहो
क्ष- क्षमा करो
त्र- त्रास मत करो
ज्ञ- ज्ञानी बनो !!

स्वप्न पाहा,विश्वास ठेवा,आणि काळजी घ्या!आयुष्य खुप सुन्दर आहे.

१०० लोकांचा एक समूह आयुष्यावर वक्तव्य
करणाऱ्या एका प्रख्यात वक्त्याचा सेमिनार अटेन्ड करीत
होते...

त्या वक्त्याने प्रत्येकाकडे एकेक फुगा (balloon) दिला .
प्रत्येकाने फुगा फुगवायचा आणि त्यावर आपले नाव टाकून
हॉल मध्ये सोडायचा होता. सर्व लोक कामाला लागले.
प्रत्येक जण आपण फुगवलेल्या फुग्यावर स्वतः चे नाव टाकीत
होता. बघता बघता हॉल १०० फुग्यांनी भरून गेला...
नंतर त्या वक्त्याने सर्वांना ५
मिनिटांचा अवधी दिला आणि इतक्या साऱ्या फुग्यांतून
स्वतः चे नाव असलेला फुगा शोधायला लावला.!!

इतक्या भरगच्च फुग्यांतून
स्वतः फुगवलेला फुगा शोधताना सर्वांची तारांबळ उडाली. ५
मिनिटे
संपली तरीही कुणीही स्वतः च्या नावाचा फुगा शोधू
शकला नाही!!
... नंतर त्या वक्त्याने प्रत्येकाला कुणाचेही नाव असलेला एक
फुगा उचलायला सांगितले. प्रत्येकाने एकेक फुगा उचलला.
वक्त्याने प्रत्येकाला सांगितले की आपल्याकडे
ज्याच्या नावाचा फुगा आहे त्या माणसाला तो फुगा देऊन टाका.
अश्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या हातातील फुग्यावर ज्याचे
नाव आहे त्याला तो देऊ लागला आणि २ मिनिटांत
प्रत्येकाकडे स्वतःच्या नावाचा फुगा आला.!!
यावर तो वक्ता बोलू लागला…
"आपल्या आयुष्याचेही असेच झाले आहे.! प्रत्येक जण आनंद,
सुख, समाधान या गोष्टी शोधण्यासाठी जंग जंग
पछाडतो आहे... परंतु खरा आनंद, खरे सुख कशात आहे
याची कुणालाही कल्पना नाही...
स्वतः चा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदात
दडलेला असतात. इतरांना त्यांचा आनंद
द्या आणि त्याबदल्यात तुम्हालाही नक्कीच आनंद
आणि समाधान मिळेल. मानवी आयुष्याच्या यशाचे खरे
गमक यातच आहे...." हे ऐकून
संपूर्ण हॉल नि:शब्द
झाला....
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल..!

माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय..
जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूच
येण मात्र अकस्मात असत.. कारण त्याला माहितीय, माणूस
सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत
नाही..

स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेण सोडल की प्रेम संपत!
म्हणुन, स्वप्न पाहा,
विश्वास ठेवा,
आणि काळजी घ्या!
आयुष्य खुप सुन्दर आहे.🌠

व.पु (एक कविता)कोण म्हणतो लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो.

व, पु. .... एक कविता

जन्मोजन्मीचं वैर काढत..
तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी,
देव स्वर्गात बांधत असतो.

लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस
लग्नानंतर राहत नाही,
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो..
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

आपला नवरा बैल आहे,
असं प्रत्येक बाईला वाटत असतं..
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं,

त्याचा तो गबाळा अवतार..
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे..
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.

लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.

ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,
असं प्रत्यक्षात घडत नाही.
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.

तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,
गच्चीत वाळत घालायला.

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते,
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते.

आपली बायको म्हैस आहे,
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो.
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.
-व. पु.

मन लावून वाचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे यांचे विचार

********* मन लावून वाचा********
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे

******************************

१. त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखिल आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.

२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.
३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांचा घराला कुंपणाची भिंत नाही.

४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही.
५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत.

६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व
CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत. पहिला नियम, कधीही आपल्यागुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु का.

७ घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

८. बिल गेट्स या जगातील दुसर्या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटलेकी वॉरन बफें बरोबर बोलण्यासारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींगसाठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेट्स हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.

९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत. तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला
-- "क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा."
-- पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.
-- ऐकावे जनाचे करावे मनाचे.
-- ब्रॅन्ड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
-- अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.
-- दरवर्षी मी काही धोरण अवलंबतो, जी पुढे वर्षभर सर्व उलाढालीत माझ्यासाठी दिपस्तंभाचे काम करतात आणि स्वत:च शिकून घेतलेल्या या धड्यांमुळे दरवर्षी माझे फ़क्त वयच वाढत नाही तर शहाणपणाही तेवढाच वाढतो।

पुरणकाळापासून चालत आलेल्या (पण विस्म्रुतीत गेलेल्या) अशाच) काही शहाण पणाच्या गोष्टी -

* अपार कष्ट करा : मेहनत कधिच वाया जात नाही, पण काम न करता केलेली बाप्ष्फळ बडबड माणसाला लयास नेल्या खेरिज राहत नाही.

* आळस झटकुन टाका : वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.

* ऊत्पन्न(मिळकत) : कधिही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने येणार्या १०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.

आपली संस्कृती आपली भाषा लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा प्रयत्न करा

एक होतं गाव.
महाराष्ट्र त्याचं नाव.

गाव खूप छान होतं,
लोक खूप चांगले होते.

मराठी भाषा बोलत होते,

गुण्यागोविंदानं ­­- नांदत होते.
त्याचं मन खूप मोठ्ठं होतं.
वृत्ती खूप दयाळू होती.
दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे.
आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे.
एकमेकांना साथ
देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे,
ते सुरेल करायचे.

महाराष्ट्रात होता एक भाग.
मुंबई त्याचं नाव.
मुंबईसुद्धा छान होती;
महाराष्ट्राची शान होती.
सर्वांच्या आकर्षणाची बाब होती.
आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते.
इथं आले,
की इथलेच होऊन
राहत होते.
"अतिथी देवो भव...!"
या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं.
पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.

हळूहळू परिस्थिती बदलू
लागली.
अतिथी जास्त आणि यजमान कमी झाले. मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली.
सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती.
मराठी आपली वाटत नव्हती.
प्रश्न मोठा गहन होता; पण माणसं मात्र हुशार होती,
दूरदृष्टीची होती.
त्यांना एक युक्ती सुचली.
दूरदेशीची परदेशातील
भाषा त्यांना जवळची वाटली.
त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील,
परदेशात जातील,
उच्चशिक्षित होतील.
सर्वांचाच,
अगदी महाराष्ट्राचाही
विकास होईल,
म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.

आजूबाजूला या भाषेत
बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.
आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली,
शिकवू लागली,
आणि मग हळूहळू
मराठी कोणीच शिकेना,
मराठी कोणीच बोलेना,
बोली भाषाही बदलली.

सगळ्यांचा नुसता काला झाला.
शुद्ध, सुंदर मराठीचा लोप झाला.

अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर-
माफ करा हं---
आपल्या 'मम्मी' बरोबर एकदा वाचनालयात गेला.
चुकून त्याचा हात एका पुस्तकावर पडला.
त्यानं ते उघडलं.
पुस्तक शहारलं,
पानं फडफडली,
आनंदित झाली.
त्यांना वाटलं,
चला निदान आज
तरी आपल्याला कोणी वाचेल.

इतक्यात त्या मुलानं
विचारलं,
(त्याच्या भाषेत)
"मम्मी" ,
"कोणत्या भाषेतलं पुस्तक आहे गं हे?''

'मम्मी' खूप सजग होती,
मुलाचं हित जाणत
होती,
सगळं ज्ञान पुरवत होती.

पुस्तक परत जागेवर ठेवत म्हणाली,
"अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस "मराठी भाषा" प्रचलित होती;
आता नाही कोणी ती
बोलत.''

पुस्तक कोमेजलं,
पानं आक्रसली,
पानांपानांतून
अश्रू ठिबकले;
पण,
हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं.
कारण, आता मराठी साठी दुःखी होणारं
काळीज कोणाचंच उरलं नव्हतं.

!!! महाराष्ट्राची शान मराठी भाषा !!!
मला एकजण म्हणतेय
तु मराठीत का 'पोस्ट' टाकतो....???
आणि,
मि तिला एवढच म्हटल,
ताई आमच्या घरात
"तुळस" आहे,
'Money plant' नाही.

आमच्या घरच्या स्ञिया "मंदीरात" जातात,
'PUB' मध्ये नाही.

आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो,
त्यांच्या डायरेक्ट गळ्यात मिठी मारत
नाही.

आम्ही "मराठी" आहोत,
आणि मराठीच राहणार.

तु English मध्ये मेसेज केला तरी मि रिप्लाय
मराठीतूनच देतो,

याचा अर्थ असा नाही की मला English येत नाही,
याचा अर्थ असा आहे की, मि तुला मराठी शिकवतोय.

अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा...

"तुळशी" ची जागा आता
'Money Plant' ने घेतलीय...!!!

"काकी" ची जागा आता 'Aunt' ने घेतलीय...!!!

'वडील' जिवंतपणिचं "डैड" झाले,

अजुन बरचं काही आहे
आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....???

"भाऊ"
'Bro' झाला...!!
आणि
" बहीण "
'Sis'...!!!

दिवसभर मुलगा "CHATTING" चं करतो...
नाही तर रात्री झोपताना Mobile वर 'SETTING' पण करतो...!!!

दुध पाजणारी "आई" जिवंतपणीचं 'Mummy' झाली...!!

घरची "भाकरं" आता कशी आवडणार हो...
५ रु. ची 'Maggi'
आता किती "Yummy" झाली...!!!

माझा मराठी माणूसच "मराठी" ला विसरू
लागलाय....


----बघा जमल्यास विचार करुन शेअर करा व
आपली संस्कृती लोप
पावण्यापुर्वी ती जपण्याचा प्रयत्न
करा ....!!! !!! !!! .

घाम गाळून मातीतून मोती पिकवनारया आमच्या शेतकरयाची भाजी विकत घेताना भाव का हो करता?

Mall मध्ये घासाघीस करत नाहित,

पेट्रोल पंपावर गप पेट्रोल भरता ,

मेडीकल वाल्याला हवे तेवढे पैसे देता,

सोनाराकड़े खाली मान घालून नोटा मोजता ,

दारूच्या बाटल्या विकत घेताना अजिबात घासाघीस करत नाहीत ,

हॉटेल मध्ये शिळपाके अन्न खाउनही गपगुमान पैसे देता
 
अन
 वरून टिप पण देता ,

मग
...............................
..................................
घाम गाळून मातीतून मोती पिकवनारया
आमच्या शेतकरयाची भाजी विकत घेताना भाव का हो करता ????????
कृतघ्न आहोत का आपण?????

नंबर मधील अध्यात्मिक ताकद...(फक्त वैचारिक लोकांसाठी)

Very interesting & meaningful msg to share:

If:
A B C D E F G H I J K LM N O P Q R S T U V W X Y Z
is equal to:
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26

Then,

H+A+R+D+W+O+R+K ;
8+1+18+4+23+15+18+11=98%
K+N+O+W+L+E+D+G+E ;
11+14+15+23+12+5+4+7+5=96%

L+O+V+E;
12+15+22+5 = 54%

L+U+C+K ;
12+21+3+11 = 47%

None of them makes 100%. Then what makes 100%?

Is it Money? NO!

M+O+N+E+Y= 13+15+14+5+25=72%


Leadership? NO!

L+E+A+D+E+R+S+H+I+P= 12+5+1+4+5+18+19+8+9+16=97%

Every problem has a solution, only if we perhaps change our "ATTITUDE"...

A+T+T+I+T+U+D+E ;
1+20+20+9+20+21+4+5 = 100%


It is therefore OUR ATTITUDE towards Life and Work that makes
OUR Life 100% Successful.

Amazing mathematics

Beautiful msg to share:
Do you agree that we have 26 alphabets in English, as given below

A = 1 ; B = 2 ; C = 3 ; D = 4 ;
E = 5 ; F = 6 ; G = 7 ; H = 8 ;
I = 9 ; J = 10 ; K = 11 ; L = 12 ;
M = 13 ; N = 14 ; O = 15 ; P = 16 ;
Q = 17 ; R = 18 ; S = 19 ; T = 20 ;
U = 21 ; V = 22 ; W = 23 ; X =24 ;
Y = 25 ; Z = 26.

With each alphabet getting a number, in chronological order, as above, study the following, and bring down the total to a single digit and see the result yourself

Hindu -
S h r e e K r i s h n a
19+8+18+5+5+11+18+9+19+8+14+1=135=9

Muslim
M o h a m m e d
13+15+8+1+13+13+5+4=72=9

Jain
M a h a v i r
13+1+8+1+22+9+18=72=9

Sikh
G u r u N a n a k
7+21+18+21+14+1+14+1+11 =108 =9

Parsi
Z a r a t h u s t r a
26+1+18+1+20+8+21+19+20+18+1=153=9

Buddhist
G a u t a m
7+1+21+20+1+13=63=9

Christian
E s a M e s s i a h
5+19+1+13+5+19+19+9+1+8=99=18=9

Each one ends with number 9

THAT IS NATURE'S CREATION TO SHOW THAT GOD IS ONE !!! 

जी माणसं,माणसं जोडतात,तीच आयुष्यात यशस्वी होतात...

स्वच्छ पाण्याचा जसा तळ दिसत असला ना की,
पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या बाबतीत असतं
त्याच्या मनाचा तळ समजला की,
त्याच्या सहवासाची भीती वाटत
नाही...आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं...!!

"ओढ" म्हणजे काय ते,
"जीव" लावल्याशिवाय कळत नाही...
"प्रेम" म्हणजे काय ते,
"स्वतः केल्याशिवाय" कळत नाही...
"विरह" म्हणजे काय ते,
"प्रेमात" पडल्याशिवाय कळत नाही...
"जिंकण" म्हणजे काय ते,
"हरल्याशिवाय" कळत नाही...
"दुःख" म्हणजे काय ते,
"अपेक्षाभंग" झाल्याशिवाय कळत नाही...
"सुख" म्हणजे काय ते,
"दुसर्यांच्या हास्यात" शोधल्याशिवाय कळत नाही...
"समाधान" म्हणजे काय ते,
"आपल्यात शोधल्याशिवाय" कळत नाही...
"मैत्री" म्हणजे काय ते,
"जीव लावल्याशिवाय" कळत नाही...
"आपली माणस" कोण ते,
"संकटांशिवाय" कळत नाही...
"सत्य" म्हणजे काय ते,
"डोळे उघडल्याशिवाय" कळत नाही...
"उत्तर" म्हणजे काय ते,
"प्रश्न पडल्याशिवाय" कळत नाही...
"जबाबदारी" म्हणजे काय हे त्या,
"सांभाळल्याशिवाय" कळत नाही...
"काळ" म्हणजे काय हे तो,
"निसटून गेल्याशिवाय" कळत नाही...
...
जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो.
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो.
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो
आणि जी माणसं,
माणसं जोडतात,
तीच आयुष्यात यशस्वी होतात...
आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात हेच
माझ्यासाठी अनमोल आहे,

परफेक्ट कसे असावे याबाबतचे चिंतन


"एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,"
मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ?

फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.
मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना.

फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे.
मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन.

फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात).
तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर...

मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद
दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ?

मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, .... पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते.

तात्पर्य :-
१) आमीर खान, राहुल द्रविड हे जन्मापासून परफेक्ट नव्हते, स्वताहाच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून, मेहनत करून ते परफेक्ट झाले.

२) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमी बघत राहिल्यास, प्रेमाच फुल कधीच कोमजणार नाही.

३) भारत देश असा, भारत देश तसा, ह्या भारताचे काहीच होणार नाही, असं म्हणत बसण्यापेक्षा, आपण भारतीय संस्कृती व भारताच्या सिद्धांताप्रमाणे खरोखर वागतो कि नाही, वआपण भारतासाठी काय करू शकतो हे पाहणे जास्त जरुरीच आहे.

चला सुखी होऊया (एक विचार )

😛 रोज दहा ते तीस मिनिटे मोकळ्या हवेत चाला आणि हो! अगदी सुहास्यवदनाने.
😛 रोज किमान दहा मिनिटे स्तब्ध…शांत राहा. एका जागी! शांत!

😛 रोज ७ तास शांत झोप काढा. शांत झोप…सुखाचा मूलमंत्र!
😛 जगताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, स्फूर्ती, उत्साह आणि दिलदारी.

😛 रोज थोडे तरी खेळा. मनोविनोदन होईल.
😛 गेल्या वर्षापेक्षा मी थोडीतरी अधिक पुस्तके वाचीन असा निश्चय करा.

😛 खूप मुबलक पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन!

😛 फळे, फळभाज्या, पालेभाज्या असे शेतातले, बागेतले, डोंगरावरले पदार्थ रोज पोटात जाऊ देत. थोडे समुद्रातलेही! तन सुखी तो मन सुखी!

😛 जरूर लक्षात घ्या की सकाळचा नाश्ता राजासारखा, जेवण राजकुमारासारखे नि रात्रीचे जेवण मात्र भिकाऱ्यासारखे असावे! म्हणजे काय राव? नाश्ता दमदमीत. दुपारची जेवण राजस; पण रात्रीचे जेवण मात्र अगदी अगदी थोडे, पुरते तेवढेच. कारण झोपेत कुठलीच शारीरिक हालचाल नसते.

😛 रोज ध्यानधरणा करा. प्रार्थना करा. आपल्या धावपळीच्या, दगदगीच्या जीवनांत तेच एक इंधन आहे जे सुख-शांती-समाधान देईल.

😛 जागेपणी स्वप्न बघा. त्याचा ध्यास घ्या. त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा.

😛 खूप आनंदी राहा. हसून खेळून, मिळून मिसळून! आप चंगा… तो जग चंगा.

😛 एक नियमच करून टाका. रोज मी किमान तीन लोकांच्या ओठांवर स्मितहास्य फुलवेन.

😛 आपले चैतन्य, आपली बहुमोल ऊर्जा लोकांबद्दल वायफळ बोलण्यात, त्यांची कुचेष्टा करण्यात वाया घालवू नका.

😛 ज्या गोष्टी आपल्या अखत्यारित नाहीत, ज्या परिस्थितीस तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल दुःख करीत बसू नका. त्यापेक्षा माझे वर्तमान कसे सुधारता येईल, ते पहा.
😛 ७० वर्षांवरील वृद्ध माणसे आणि ६ वर्षांखालील छोटी मुले यांच्यासमवेत दिवसातील थोडातरी वेळ नियमित घालवा. वृद्धांना जगण्याची उमेद द्याल नि छोट्यांकडून ऊर्जा घ्याल!

😛 हे जीवन फार छोटे आहे. दुसऱ्याचा हेवा, मत्सर, द्वेष करण्याइतके खचितच मोठे नाही.

😛 स्वतःचा फार गंभीरपणे विचार करू नका. इतरांना तुमची काही पडलेली नाही. ते तुमचा इतका विचार अजिबात करीत नाहीत.

😛 भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. आपल्या जोडीदाराला त्याच्या भूतकाळातील चुकांसाठी टोकणे, चटकन लागेलसे बोलणे, टोचत राहणे सोडून द्या. त्यामुळे आपला जोडीदार पुन्हा पुन्हा दुखावला जाईल आणि आपले वर्तमान बिघडेल. त्याचे काय हो! सो? लॉक द पास्ट, एन्जॉय द प्रेझेंट!
😛 रोज विद्यार्थी शाळेत जातात. जीवन ही आपली शाळा समजा. एनी प्रॉब्लेम? अहो तो बीजगणिताचा तास समजा. एखादा प्रॉब्लेम नाही सुटला तरी तास संपतो! संपते ना? पण त्यातून आपण काहीतरी धडा शिकतोच! तसेच जीवन आहे. काही समस्या सुटत नाहीत; पण त्यातून मिळालेल्या धड्याने आपण शहाणे होतो हेही नसे थोडके!

😛प्रत्येक वेळी तुम्हीच कसे जिंकणार? इतरांनाही थोडी संधी द्या .
😛 दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना नको. त्याचे वरवरचे सुखविलास पाहून मत्सरग्रस्त होऊ नका. तो आतून काय 'भोगतोय', काय 'सोसतोय' ते तुम्हास कोठे ठाऊक आहे?

😛 क्षमाशस्त्र ज्याचे हाती त्यास काय तोटा? आनंदाच्या वाटा शोधा आनंदाच्या वाटा!…क्षमाशील झालात की सुखाची रांगोळी आपल्याच दारात!…
😛 दुःखाचे, तणावाचे दिवस आहेत? संपतील राजा! परिस्थिती कायम बदलत राहाते. लाल सिग्नल नंतर हिरवा येतोच की!

😛 तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे! हे धरा मनी. पहा… कसे आशादायी नि प्रसन्न वाटेल.
😛 तुमचे कुटुंब तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. त्यांना प्राधान्य द्या.

😛 काय वाटेल तो पसंग येवो! धैर्य सोडू नका. उठा, उत्तम वेश परिधान करा व धैर्यांने जगास सामोरे ज
😛 तुमचा आत्मा सुखी आहे! मग तुम्ही दुःखी? का? कशासाठी? सुखी राहा.

😛 हे सारं आवडलं ना? मग आपल्या आवडत्या मित्रांना कळवा जरूर! मला हा सुखाचा संदेश माझ्या आवडत्या मित्रानेच पाठवलायजो मी आवडत्या वाचकांपर्यंत पोहोचविलेला आहे..
बी हॅप्पी!

ज्यांनी जन्मच नाही तर मरण देखील वाटुन घेतलं.......

धनगर मेँढरे चरायला सोडुन ढोल वाजवत बसला होता.



त्याने
पाहीलं की ढोलच्या आवाजाने एक
हरीणी त्याच्या शेजारी येऊन
बसली,


जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप
पडायची तसतसं त्या हरीणीच्या डोळ्यांतुन अश्रु यायचे,




एक दिवस गेला,



दोन दिवस
गेले, तीन, चार, पाच दिवसांमागुन दिवस गेले.




पण परिस्थिती काही बदलत नव्हती,



धनगर जसजसं
ढोल वाजवायचा ती हरीणी तिथे येऊन जवळ बसुन रडु लागायची..



एक दोनवेळा त्या धनगराने त्या हरीणीला हाकलले
देखील पण जसजशी ती थाप ऐकु
यायची ती पुन्हा त्या आवाजाने तिकडे ओढली जायची...




मग एक दिवस धनगर ढोल
वाजवता वाजवता मध्येच थांबला,




ती हरीणी रडणं
थांबवुन निघुन जाऊ लागली.



त्याने
पुन्हा वाजवायला सुरुवात
केली.



हरीणी पुन्हा जवळ आली,




धनगराने हरीणी समोर हात जोडले आणि म्हणाला,


माझं काही चुकतं का गं?



मी कित्येक दिवस बघतोय
जेव्हा जेव्हा मी ढोल वाजवतो तेव्हा तेव्हा तु ईथे येऊन रडतेस.



कारण काय आहे.


सांगना माझं
काही चुकतं का गं?



तेव्हा ती हरीणी म्हणाली,


तुम्ही कोण आहात
मला माहीती नाही,



हे काय वाद्य आहे मला माहीती नाही,



पण जेव्हा तुम्ही हे वाद्य
वाजवता,



यावर पडणारी तुमच्या हाताची प्रत्येक थाप माझ्या काळजावर घाव घालते कारण
याला जे कातडं लावलंय ना,


ते माझ्या आयुष्याचा साथीदार,माझ्या नवर्याचं आहे..


हे ऐकुन धनगर निशब्द झाला..



हरीणी पुढे म्हणाली,


माझी एक विनंती आहे तुम्हाला॥


माझ्या मृत्युनंतर
या वाद्याच्या एका बाजुला माझं कातडं लावा,


कारण या वाद्यातुन मनाला परमोच्च सुख
देणारे संगीत तेव्हाच बाहेर पडेल


जेव्हा दोन्ही बाजुंनी ढोल तितक्याच लयमध्ये
वाजवला जाईल.



म्हणजेच त्याच्या एवढंच दुःख
मलाही सहन करावं लागेल..



असं म्हणुन
त्या हरीणीने जागीच प्राण सोडले..



दुःखी मनाने त्या धनगराने त्या हरीणीचं कातडं
ढोलच्या एका बाजुला लावलं. आज तो ढोल
वाजवताना त्या हरीणीच्या डोळ्यातुन पाणी येत
नाही

 पण तो ढोल
वाजवणाऱ्या धनगराच्या डोळ्यांत मात्र अश्रु दाठुन येतात कारण जेव्हा तो ढोल दोन्ही बाजुने
वाजतो तेव्हा त्याला वाटतं ते जोडपं एकमेकांशी बोलुन आपली सुख दुःखं वाटुन घेत
आहेत.



ज्यांनी जन्मच नाही तर मरण देखील वाटुन घेतलं.......

 True love.....

मैत्री एक सोपी व्याख्या आहे..

एका सुंदर नात्यावर पु.ल.देशपांडे. यानी लिहीले :

मैत्री एक सोपी व्याख्या आहे..
'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.'
शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणल.....
अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा. ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या...,..
अशिष जपानच्या एका ट्रेन मधे चढला. ट्रेन तशी मोकळी होती. तो ज्या डब्या (मराठीत ड्बा) मधे होता त्यात जेमतेम २-३ माणसे होती. सिट मोकळे असल्यामुळे तो सरळ जाऊन समोरच्या एका सिट वर बसला. थोडा वेळ झाला तसा एक मध्यम वर्ग जपानी व्यक्ति त्याच्या शेजारीच पण एक सिट सोडुन बसला. दोन-तीन मिनटाने सहज त्याचे लक्ष त्या व्यक्तिकडे गेले तर तो त्याच्या सिटमधे काहितरी छोटी वस्तु घुसवत होता. अशिष ला जरा विचित्र वाटले म्हणुन त्याने त्याची नजर वळवुन दुसरीकडे पाहायला लागला. बराच वेळ झाला तरी ती त्या व्यक्तिचं ते काम चालुच होतं. न राहुन अशिष ने निरखुन पाहिलं तर त्याच्या हातात एक सुई दोरा होता आणि तो त्याच्या खाली फ़ाटलेली सिट शिवत होता. अशिष ला थोडं आश्चर्य वाटलं. जेंव्हा त्याची सिट शिवुन झाली तेंव्हा अशिष ने न राहुन त्या व्यक्तिला जपानी भाषेत विचारलं. (भाषांतरीत)

अशिष : माफ़ करा पण मला प्रश्न होता ?

व्यक्ति : हो विचारा कि.

अशिष : तुम्ही ट्रेन चे कर्मचारी आहात का ? तुम्ही सिट शिवताय म्हणुन म्हटलं.

व्यक्ति : नाही. मी कुणी कर्मचारी नाही. साधा शिक्षक आहे. लहान मुलांच्या शाळेतील. दररोज ह्याच ट्रेन ने प्रवास करतो. दररोज ही सिट फ़ाटलेली पाहत असतो. आज आठवनीने सुई-दोरा आनुन शिवुन टाकली. कशी जमलीये छान ना ? (हसत हसत )

अशिष : हो. पण तुम्ही का शिवताय ?

व्यक्ति : कारण हि फ़ाटलेली सिट खुप विचित्र दिसत होती. जर उद्या कुणी बाहेरुन आलेल्या व्यक्तिने हे पाहिलं असतं तर आमच्या देशाचं नाव त्याच्या साठी खराब झालं असतं. माझा देशाचं नाव कुठे मलिन झालेलं मला आवडनार नाही. शेवटी हि आमचीच संपत्ती आहे आणि आम्हालाच संभाळायची आहे. आमच्या देशाची काळजी आम्ही नाहि घेणार तर कोण घेणार ?

ट्रेन थांबली आणि "अच्छा ! जातो." म्हणुन ती व्यक्ति गेली देखील.

अशिष त्या वेळी फ़क्त ’निशब्द’ होता. स्वत:च्या देशावर भरभरुन प्रेम करणाऱ्या त्या साध्या जपानी माणसाला मनातुन एक कडक सलाम ठोकला. माणुसकिचे, राष्ट्रप्रेमाचे, संस्कृतीचे धडे जगाला देणाऱ्या त्या जपानचं मुळ कशात आहे ह्याचं उत्तर अषिश ला मिळालं होतं.


: संस्कार आणि संस्कृती.
फुटबॉल च्या सामन्यात पराभव झाल्यानंतर,
सामना बघायला आलेल्या जपानी प्रेक्षकांनी सामना संपल्यावर
थांबून त्यांच्या भागातील कचरा प्लास्टिक च्या पिशव्यांत भरून
साफसफाई केली. या पिशव्या बरोबर नेऊन शहरातील
कचरा टाकण्या साठी केलेल्या जागांनवर नेऊन टाकल्या.
देश मोठे होतात ते अशा नागरिकान मुळे...... ट्रक च्या मागे
"मेरा देश महान" असे लिहून नाही.

परवा अचानक शाळेतला, जुना बाक भेटला..

परवा अचानक शाळेतला, जुना बाक भेटला..
शरीर तुटकं पाय बारीक, थोडा म्हाताराच वाटला...

"ओळखलसं का मला?", विचारलं त्याने हसुन...
वेळ असेल तुला तर बोलुया थोडं बसुन...

गाडी पाहताचं आनंदला, हलवली तुटकी मान...
"खुप मोठा झालासं रे, पैसा कमावलासं छानं"

"ओळखल्यास का बघ ह्या,
माझ्यावरच्या रेघा...
भांडण करुन मिळवलेली,
दोन बोट जागा...


अजुनही भेटतात का रे,
पक्या, मन्या, बंटी...?
टाळ्या देत करत असालं,
मनमोकळ्या गोष्टी...

डबा रोज खाता का रे,
एकमेकांचा चोरुन?
निसरड्या वाटा चालता का,
हाती हात धरुन..?


टचकन् डोळ्यात पाणी आलं,
कंठ आला भरुन...
मित्र सुटले, भेटी सरल्या,
सोबत गेली सरुन...

धावता धावता सुखामागे,
वळुन जेंव्हा पाह्यलं...
एकटाचं पुढे आलो मी,
आयुष्य मागे राह्यलं...


त्राण गेलं, आवेश संपला,
करावं तरी काय..?
कोरड पडली घशाला,
थरथरले तरणे पाय...

तेव्हढ्यात आला शेजारी,
अन् घेतलं मला कुशीत...
बस म्हणाला क्षणभर जवळ,
नक्की येशील खुशीत...

"अरे वेड्या पैश्यापाठी,
फिरतोस वणवण...
कधी तरी थांबुन बघ,
फिरवं मागे मन..."

मित्र सगळे जमवं पुन्हा,
जेव्हा येईल वीट...
वंगण लागतं रे चाकांना,
मग गाडी चालते नीट...

शाळेतल्या त्या सोबत्याचा,
खुप आधार वाटला...
परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला...

चाणक्य के 15 अमर वाक्य

समज जीने की .....

1)➤दूसरों की गलतियों से सीखो अपने ही ऊपर प्रयोग करके सीखने को तुम्हारी आयु कम पड़ेगी।
2)➤किसी भी व्यक्ति को बहुत ईमानदार नहीं होना चाहिए। सीधे वृक्ष और व्यक्ति पहले काटे जाते हैं।
3)➤अगर कोई सर्प जहरीला नहीं है तब भी उसे जहरीला दिखना चाहिए वैसे दंश भले ही न दो पर दंश दे सकने की क्षमता का दूसरों को अहसास करवाते रहना चाहिए।
4)➤हर मित्रता के पीछे कोई स्वार्थ जरूर होता है, यह कड़वा सच है।
5)➤कोई भी काम शुरू करने के पहले तीन सवाल अपने आपसे पूछो... मैं ऐसा क्यों करने जा रहा हूँ ? इसका क्या परिणाम होगा ? क्या मैं सफल रहूँगा?
6)➤भय को नजदीक न आने दो अगर यह नजदीक आये इस पर हमला कर दो यानी भय से भागो मत इसका सामना करो।
7)➤दुनिया की सबसे बड़ी ताकत पुरुष का विवेक और महिला की सुन्दरता है।
8)➤काम का निष्पादन करो, परिणाम से मत डरो।
9)➤सुगंध का प्रसार हवा के रुख का मोहताज़ होता है पर अच्छाई सभी दिशाओं में फैलती है।"
10)➤ईश्वर चित्र में नहीं चरित्र में बसता है अपनी आत्मा को मंदिर बनाओ।
11)➤व्यक्ति अपने आचरण से महान होता है जन्म से नहीं।
12)➤ऐसे व्यक्ति जो आपके स्तर से ऊपर या नीचे के हैं उन्हें दोस्त न बनाओ,वह तुम्हारे कष्ट का कारण बनेगे। समान स्तर के मित्र ही सुखदायक होते हैं।
13)➤अपने बच्चों को पहले पांच साल तक खूब प्यार करो। छः साल से पंद्रह साल तक कठोर अनुशासन और संस्कार दो। सोलह साल से उनके साथ मित्रवत व्यवहार करो। आपकी संतति ही आपकी सबसे अच्छी मित्र है।"
14)➤अज्ञानी के लिए किताबें और अंधे के लिए दर्पण एक समान उपयोगी है।
15)➤शिक्षा सबसे अच्छी मित्र है। शिक्षित व्यक्ति सदैव सम्मान पाता है। शिक्षा की शक्ति के आगे युवा शक्ति और सौंदर्य दोनों ही कमजोर है।
इन सब वाक्यों को अपने जीवन में उतार कर अपना जीवन सफल बनावे यही मेरी की प्रार्थना है।

मृत्यूनेही म्हणावं, "जग अजून, मी येईन नंतर....!!!!

🐇निर्णय चुकतात आयुष्यातले
आणि
आयुष्य चुकत जाते..

🐔प्रश्न कधी कधी कळत नाहीत
आणि
उत्तर चुकत जाते..

🐵सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता..

पण
🐘प्रत्येक वेळी नवनवीन गाठ बनत जाते!

🐪दाखविणाऱ्याला वाट माहित नसते..
🐀चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते...!

🐮दिसतात तितक्या सोप्या नसतात
काही गोष्टी..

🐢"अनुभव" म्हणजे काय हे
तेव्हाच कळते...

🐬असे मित्र बनवा जे कधीच
साथ सोडणार नाही..

🐎असे प्रेम करा ज्यात
स्वार्थ असणार नाही..

🐤असे हृद्य बनवा कि ज्याला
तडा जाणार नाही..

🐸असे हास्य बनवा ज्यात
'रहस्य' असणार नाही..

🐛असा स्पर्श करा ज्याने
जखम होणार नाही..

🐙असे नाते बनवा ज्याला
कधीच मरण नाही..

🐝आयुष्य थोडसच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं

🐌आयुष्य थोडंच जगावं
पण जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं

🐳प्रेम असं द्यावं की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
💐मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भानं नसावं,
आयुष्य असं जगावं
की...
🐉मृत्यूनेही म्हणावं, "जग अजून, मी येईन नंतर....!!!!

आयुष्यातले दहा सत्य...

 ¤आयुष्यातले दहा सत्य ....... .

¤ सत्य no 1 ..- आयुष्यात
निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु
शकते


¤.. सत्य no. 2 - माणसं त्यांच्या गरजेनुसार
जवळ येतात आणि सोयीनुसार दुर जातात... .

¤सत्य no. 3 --इथे फक्त पैशाला किंमत आहे
माणसांना नाही
.

¤सत्य no 4--.... कीतीही चांगला मित्र
किँवा मैत्रिण असले तरीही एकाच दुस-
यापेक्षा चांगल झाल की थोडीफार
तरी असुया निर्माण होतेच.

¤सत्य no 5 --...सुंदर चारित्रापेक्षा सुंदर
चेह-याला जास्त मान आहे


¤सत्य no 6--....प्रत्येकालाच आपल दु:ख दुस-
यांपेक्षा मोठ वाटत किँबहुना आपण दुस-
यांपेक्षा जास्त सोसलय असं भासवत असतात..

¤सत्य no 7--....ज्या व्यक्तीच्या आपण सर्वाँत
जास्त जवळ असतो , काळजी करतो तीच
व्यक्ती जीवनात जास्त दुःख देते.


¤सत्य no 8--...कुणी कुणासाठी मरत नसत
किंवा कुणाच्या विरहाने मरत नसत आयुष्य हे पुढे
जातच असत.

¤सत्य no 9--चांगल्या मुलीँना वाईट मुल
भेटतात ,चांगल्या मुलांना वाईट
मुली आणि प्रेमात पडतात
पण
जेव्हा चांगला मुलगा आणि मुलगी ऐकमेकांच्यासमोर
येतात तेव्हा प्रेमात पडायला घाबरतात
भूतकाळातल्या कडू अनुभवामुळे आणि आयुष्यभर
ऐकमेकांचे केवळ चांगले मित्र मैत्रिण बनुन
राहतात....


¤सत्य no 10--....सोय बघून
केला जातो तो व्यवहार
आणि गैरसोय बघुनही केल जात ते म्हणजे प्रेम


आपल्या लाडक्या गणेशाच्या आरतीचा अर्थ....

 
एक विनंती...
श्री गणेशाचे आगमन काही दिवसांवर आले आहे.
घरगुती तसेच सार्वजानिक
गणपतींच्या मुर्तिंची बुकिंग करण्यास देखिल
सुरुवात झाली आसेल. सर्व गणेश भक्तांना एक
विनंती आहे की गणेशमूर्ती बुक
करताना मूर्ति फ़क्त श्री गणेशाचीच
असावी याची दक्षता घ्या.
मूर्ति सोबत ईतर कोणताही देव (साईं बाबा,
गजानन महाराज, लक्ष्मी/सरस्वती माता) तसेच
कोणताही प्राणी/पक्षी (मच्छी च्या तोंडातील
गणपति, गरुडावर बसलेला गणपति) नसावा.
शंकर आणि पार्वती माते सोबत
असणाऱ्या गणेश मूर्तिचा विचार सुद्धा करू नये.
कारण, मित्रांनो विसर्जन करताना आपण
या सर्वांचे विसर्जन करतो. हे पूर्णपणे अयोग्य
आहे. विसर्जन फ़क्त गणेश मूर्तीचे करायचे
असते आणि नकळत आपल्या हातून ईतर देवतांचे
विसर्जन होते ते पूर्णपणे अयोग्य आहे.
मूर्तिकार एकेक शक्कल लढवून अशा सुंदर
आणि सुबक मूर्त्या बनवतात पण आपलं आपण
ठरवायचं योग्य-अयोग्य काय आहे.

🔸सुखकर्ता दु:खहर्ता.
🔹म्हणजे :- (सुख देणारा दुःख हरण करणारा)
🔸नुरवी
🔹म्हणजे :-दुःखाचा समुळ नाश करतो.
🔸पुरवी प्रेम कृपा जयाची.
🔹म्हणजे :-त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव
भक्ताला लाभ होतो.
🔸सर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची ।।
🔹म्हणजे:- गणेश सर्वांगाने सुंदर आहे.
त्याने शेंदुराची उटी लावली आहे ।
🔸कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।।
🔹म्हणजे :- त्याच्या कंठात मोत्याची माळ
झळाळत आहे ।।१।।
-------------------------
-------------------------
🔸जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मन : कामना पुरती ।।धृ।।
🔹म्हणजे:-हे देवा ,तुझा जयजयकार असो !
तु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस । तुझ्या केवळ
दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण
होतात ।।धृ।।
🔸रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
🔹म्हणजे:- हे गौरीकुमारा रत्न जडवलेला
मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे ।
🔸चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
🔹म्हणजे :-कुंकू आणि केशर मिश्रित
चंदनाची उटी तु लावली आहे ।
🔸हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
🔹म्हणजे :-हिरयानी जडलेला मुकुट तुझ्या
मस्तकावर शोभून दिसत आहे.
🔸रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।।२।।
🔹म्हणजे :-तुझ्या पायांतील वाळ्यांतील
घूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे ।।२।।
🔸लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
🔹म्हणजे :-मोठे पोट असणारया ,पीतांबर
नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा)
असलेला.
🔸सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
🔹म्हणजे :- सरळ सोंड व वाकडे तोंड असणारया,म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने)
चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुण
त्याना सरळ मार्गावर आणणारया, त्रिनयना
(३ नेत्र असणारया).
🔸दास रामाचा वाट पाहे सदना ।
🔹म्हणजे :- हे गणपते मी रामाचा दास
( समर्थ रामदासस्वामी) माझ्या घरी मी तुझी
आतुरतेने वाट पहात आहे.
🔸संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।३ ।।
🔹म्हणजे :- हे सुरवरवंदना - सर्वश्रेष्ठ देवां कडून वंदिल्या जाणारया हे गजानना, सर्व
संकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ
कर.
🔸निर्वाणी - अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी
तु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्राथना .

-समर्थ रामदास स्वामी.
((संदर्भ :- आरतीसंग्रह अर्थासह सनातन लघुग्रंथ )).

लक्षात ठेवा 'संकटी' पावावे संकष्टी नाही

Tuesday, 27 May 2014

तुमचे आणि माझे हे नाते माझ्यासाठी अनमोल आहे.

तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल
पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल...
माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...
पण "काय बोलावे" हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते...
ओढ म्हणजे काय ते जीव
लावल्याशिवाय कळत नाही.....
प्रेम म्हणजे काय ते स्वतः
केल्याशिवाय कळत नाही.....
विरह म्हणजे काय ते प्रेमात
पडल्याशिवाय कळत नाही.....
जिंकण म्हणजे काय ते
हरल्याशिवाय कळत नाही.....
दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग
झाल्याशिवाय कळत नाही.....
सुख म्हणजे काय ते दुसर्यांच्या हास्यात
शोधल्याशिवाय कळत नाही.....
समाधान म्हणजे काय ते आपल्यात
शोधल्याशिवाय कळत नाही.....
मैत्री म्हणजे काय ते जीव
लावल्याशिवाय कळत नाही.....
आपली माणस कोण ते
संकटांशिवाय कळत नाही.....
सत्य म्हणजे काय ते डोळे
उघडल्याशिवाय कळत नाही.....
उत्तर म्हणजे काय ते प्रश्न
पडल्याशिवाय कळत नाही.....
जबाबदारी म्हणजे काय हे त्या
सांभाळल्याशिवाय कळत नाही.....
काळ म्हणजे काय हे तो निसटून
गेल्याशिवाय कळत नाही.....🎭
मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण
माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर
मी कमावलेली संपत्ती
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही,
परंतु
मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील
अश्रूंचा एक थेंब हाच
माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच
माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई
असेल...
तुमचे आणि माझे हे नाते माझ्यासाठी अनमोल आहे..!!!

आंधळा भिकारी आणि लेखक (आयुष्य कुणी जाणलंय !!!)


मराठी स्क्रॅप - नक्की वाचा ही गोष्ट...आणि आवडल्यास शेअर
करा...!!!
एक आंधळा भिकारी रस्त्यावर
एका बाजूला बसलेला... त्याच्याकडे कुणाचेही लक्ष
नाही... तो एव्हढा दरिद्री आहे की त्याला अश्रू
देखील महाग झालेत.... गेली कित्येक वर्षे
तो रडलेला नाही.
.
.
एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला...
.
.
.
खिशात दमडादेखील नसतांना तो लेखक फिरायला बाहेर
पडतो.
.
.
त्याची नजर त्या भिका-याकडे
आणी त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.
.
.
त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन
खडू पडलेले.
.
.
हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो..
.
.
"मित्रा, मी एक लेखक आहे,ज्याच्याकडे एक
दमडादेखील नाही, पण माझ्याकडे
कला आहे,...माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे..
ती मी तुला देउ शकतो...तुझ्या परवानगीने
मी या पाटीवर काही लिहू का?"
.
.
"साहेब" भिकारी म्हणतो "
माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही ...मी एक गरीब
आंधळा भिकारी ...तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं
ते करा."
.
.
तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो.
.
.
त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की,
एकदम जाणा-या येणा-यांपैकी प्रत्येकजण
त्याच्याजवळ थांबून त्याच्यापूढ्यात पैसे टाकू
लागलाय.
.
.
थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते...
.
.
तो भिकारी बेचैन होतो...नाण्यांची रास वाढतच
जाते...
.
.
तो एव्हढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-
यांपैकी एकचा हात पकडतो आणि म्हणतो " साहेब
माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल ... मी एक
गरीब आंधळा भिकारी आहे...मला कृपा करुन जर
या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार
उपकार होतील."
.
.
तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो...
.
.
.
.
"वसंत ऋतू, बहरलेली सृष्टी,
आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी."
.
.
.
.
भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.
.
.
.
आयुष्य कुणी जास्त जाणलं?
या ओळी लिहीणा-या लेखकानं? त्या ओळी वाचून पैसे
टाकणा-या लोकांनी? कि इतक्या वर्षांनी रडणा-
या त्या भिका-यानं??

Tuesday, 13 May 2014

ओळख महत्वाची आहे.

ओळख :-
पूर्वी बालमनावर संस्कार करण्यासाठी गोष्टी सांगण्याची पद्धत होती.
मी ऐकलेली एक गोष्ट मला सतत आठवते. 
गोष्टीत मोठय़ा प्रवासाला निघालेला एक नायक असतो. 
तो लगबगीनं चालत असताना अचानक मागून हाका ऐकू येतात. 
तो गडबडतो.थांबतो. मागे वळून बघतो. तो थांबून मागे वळतो- न वळतो तोच त्याचा दगड होत असे.
आता रस्ते दिसत नाहीत.दगडच दिसतात. सर्व रस्ते खचाखच दगडांनी भरून गेले आहेत.
थांबून, मागे वळून बघणारे पायाखाली दगड होऊन पडले आहेत.
आता आपला दगड होऊ नये म्हणून आपण कुणाच्या हाकेला 'ओ' देत नाही. थांबत नाही. धावत राहतो.
'थांबला तो संपला' या संस्कारामुळे आपण इतरांपेक्षा जरा जास्तच जोरात धावतो.
पायात गोळे येतात. छातीत कळ येते. घशाला कोरड पडते. पण आपण थांबत नाही.
बसल्या बसल्या, झोपल्या झोपल्या, वाचताना, जेवताना आपण धावतच असतो.
पण काहीतरी गडबड आहे. एवढं धावूनही आपण पुढे सरकत नाही.
जेवढं जोरात धावावं, तेवढे आपण मागे पडत जातो. आपल्या मागचे रांगणारेही पुढे जातात.
पण आपण तिथेच! काय होतंय कळत नाही. मन खिन्नविखिन्न होऊन जातं.
असो! परवा रिक्षातून उतरलो. रिक्षा दिसेनाशी झाल्यावर वळलो. 
वळल्यावर आपला स्मार्ट फोन रिक्षात राहिल्याचं लक्षात आलं. 
चार महिन्यांत तिसरा फोन गेला. जीवन निर्थक वाटू लागलं.
स्वत:वरचा विश्वास उडाला. हा-हा म्हणता कॉन्फिडन्स गेला. 
समोरच पोलीस स्टेशन होतं म्हणून पोलीस स्टेशनात घुसलो. 
कॉन्फिडन्स गेल्यामुळे मी नवख्या चोरासारखा दिसत होतो. 
पोलीस स्टेशनात मोबाइल हरवलेल्याचा सन्मान होईल अशी अपेक्षा नव्हती, 
पण.. मला रिक्षाचा नंबर आठवत नव्हता. रिक्षावाल्याचा चेहराही बघितला नव्हता. 
फक्त त्याची पाठ तेवढी आठवत होती. पाठीचं वर्णन कसं करावं,कळेना. 
पाठीवरून रिक्षा कशी शोधता येईल, तेही समजेना. भीती वाटायला लागली. 
मी कॉन्फिडन्स गोळा करत असतानाच पोलीस एका गुंडाला घेऊन आले.
गुंडाच्या चालण्या-बोलण्यात रुबाब होता. आवाजात दरारा होता. 
त्याचा आत्मविश्वास बघून मला आपल्या जगण्याची लाज वाटू लागली. 
तेवढय़ात गुंडापेक्षा दुप्पट आत्मविश्वास व चौपट रुबाब असलेल्या एका गृहस्थाने प्रवेश केला. 
त्याने पटापटा दहा ओळखी सांगितल्या. पाच-पन्नास व्हिजिटिंग कार्डस् फेकली. 
काही थोरामोठय़ांसोबत काढलेले फोटो दाखवले. एका फोटोत ते मुख्यमंत्र्यांच्या मागे उभे होते. 
दुसऱ्या फोटोत ते उपमुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. 
एका फोटोत तर ते ओबामांसोबत होते. दोघांमध्ये फरक करता येत नव्हता.
त्या गृहस्थाने 'गुंडाला सोडावं अशी तमाम थोरामोठय़ांची इच्छा आहे,' असं सांगितलं. 
पोलीस गडबडले.त्यांना निरोप द्यायला दारापर्यंत गेले. मीही गेलो. 
ते हात हलवत होते. गळा दाटून आला. 
मी खूप स्वस्तातल्या मोबाइल फोनची चौकशी करायला समोरच्या दुकानात गेलो. 
असो! आपलं काम व्हायला हवं असेल तर ओळख हवीच.
आता ओळखीशिवाय पानही हलत नाही. ओळख नसलेल्याच्या अंगाला वाराही शिवत नाही 
अशी स्थिती आहे.
परवा एका सांस्कृतिक कार्यक्रमाला गेलो.
तिथे अनेक वजनदार लोक भेटले.
त्यांच्या थोरामोठय़ांबरोबर असलेल्या ओळखी ऐकून हबकायला झालं.
भेटलेल्यांपैकी चौघे राणे-साहेबांना ओळखणारे निघाले.
त्यातले दोघे राणेसाहेबांच्या मांडीला मांडी लावून बसतात,
तर दोघे म्हणे चक्क मांडीवरच बसतात असं कळलं.
दहाजण पवारांच्या वर्गात होते. दोघे पवारांबरोबर क्रिकेट खेळत,
तर एकजण कॅरम खेळणारा निघाला. एकाचा मेहुणा गडकऱ्यांकडे ड्रायव्हर आहे.
सर्व निर्णय तोच घेतो, हे ऐकून आनंद झाला.
ज्यांना बघून गवळीही कमरेतून वाकतात असेही काहीजण निघाले.
साधी राहणी व दरिद्री विचारसरणी असलेले भले मास्तर भेटले.
 ते शाळेत दाऊदला पी. टी. शिकवीत अशी माहिती कळली. 
दाऊद आजही न चुकता गुरुपौर्णिमेला एस. एम. एस. करतो, हे
सांगताना त्यांना गदगदल्यासारखं होत होतं.
माझी कुठेच ओळख नसल्यामुळे मला काहीच बोलता आलं नाही.
कॉलनीतली कुत्रीही मला कचरा गोळा करणारा समजून माझ्या अंगावर धावतात,
हे सांगण्याचं धाडस मला झालं नाही.
स्वत:विषयी हीन-दीन भावना निर्माण झाल्यामुळे आता आपण स्वत:लाही ओळख देऊ नये,
असे विचित्र विचार मनात येऊ लागले आहेत.
असो! आमचे एक शेजारी मूल जन्मल्या जन्मल्या मुलाला बालवाडीत
घालण्यासाठी चिठ्ठी आणायला मुख्यमंत्र्यांकडे गेले होते.
पण
मुख्यमंत्री स्वत:च्या मुलासाठी चिठ्ठी आणायला दिल्लीला गेल्यामुळे
म्हणे भेट झाली नाही! खरं-खोटं देव जाणे. पण
आपल्यासारख्यांचं पुढे काय होईल, असा विचार मनात
आला तरी थरथरायला होतं.

ओळख हवीच. ओळख
नसलेला माणूस ताशी शंभर मैल वेगाने
धावला तरी इंचभरही पुढे सरकत नाही. ओळख
असलेला झोपून राहिला तरी तो उठायच्या आत शंभर मैल पुढे
गेलेला असतो. आता मी ठरवून टाकलं आहे- मागे राहायचं
नाही. ओळखी वाढवायच्या. लहान-थोर, भला-बुरा दिसेल
त्याच्याशी सलगी करायची, सर्वाशी खेळीमेळीनं वागायचं.
छोटय़ांना कडेवर घ्यायचं, मधल्यांवर प्रेम करायचं,
ज्येष्ठांच्या पायावर पडायचं. ओळखी वाढवून पुढे जायचं.
खूप मोठं व्हायचं.

परवा कंटाळा आला म्हणून फेसबुकवर फिरत होतो.
 कुणा एका मुलीने काखा वर केलेल्या पोजमधला आपला एक फोटो फेसबुकवर टाकला आहे.
सत्राशेसाठ लोकांना हा फोटो आवडला आहे. मोठं होण्याच्या प्रवासात काखा वर करणारेही उपयोगी पडू
शकतात, हे लक्षात घेऊन मीही फोटो खूपच आवडल्याचं व भारावून गेल्याचं कळवलं आहे.
आमचे शेट्टी नावाचे एक स्नेही आहेत. शेट्टीचा बार आहे.
शेट्टीला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही. कट्टर शाकाहारी माणूस.
शेट्टी श्रद्धाळू आहे. घरून बारपर्यंतच्या प्रवासात तो सतत डावी-उजवीकडे बघत हात जोडत राहतो.
एकाच धर्मावर विसंबून न राहता क्रूस, चाँदतारा, त्रिशूळ कशालाही मनापासून हात जोडतो.
त्याने सर्व धर्माच्या देवांशी सलगी केली आहे. शेट्टीची वरपर्यंत ओळख आहे.
शेट्टी रसिक आहे. स्वत: वाचत नसला तरी त्याला साहित्यात खूपच इंटरेस्ट आहे.
परवा टेबलावर रवींद्रनाथ टागोरांवर चर्चा सुरू होती.
त्यावर 'टागोर नगर में हमारा छोटा भाई का डान्स बार है..'
अशी टागोरांविषयी नवीन माहिती त्याने दिली.
असो. तर आता शेट्टी सैफ अली, कतरिना अशा लोकांना घेऊन एक हिंदी सिनेमा काढतो आहे.
गोष्ट शेट्टीनेच रचली आहे.
बारमधला जेवणाची ऑर्डर लिहून घेणारा एक ज्येष्ठ वेटर पटकथा लिहितो आहे.
किचनमध्ये काम करणाऱ्या आचाऱ्याने सहा गाणी रचली आहेत.
आपलं दु:ख, आपले भोग,आपल्या जगण्यातलं काहीही गाण्यात येऊ न देता गाणं रचणं
हे कठीण काम आहे.
महाकवींनाही हे जमलं नाही, पण आचाऱ्याला ते जमून गेलं आहे.
आपल्या लेखनाला दु:खाची झालर लावण्याचा थिल्लरपणा त्याने केलेला नाही.
मोठय़ा माणसांच्या व सर्वधर्मीय देवांच्या ओळखीमुळे सिनेमा धंदा करील,
सर्व अॅवार्डस् मिळतील, भारतातर्फे सिनेमा ऑस्करसाठी जाईल असा शेट्टीला भरवसा वाटतो आहे.
अलीकडे गुण,प्रतिभा वगैरे गोष्टींना काही महत्त्व उरलेलं नाही. ओळख हवी.
सध्या सर्वत्र स्पर्धाचं पेव फुटलंय.(जोम आला आहे.)
गल्लीबोळांतून स्वत:च्या आई-वडिलांच्या नावाने नसलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा भरवल्या जातात.
स्पर्धा म्हटली की परीक्षक लागतात. सध्या काहीच काम नसलेले व नजीकच्या काळात काम
मिळण्याची शक्यता नसलेल्या दोघा-तिघांची निवड केली जाते.
त्यांना कलेतलं काही कळायला पाहिजे अशी कुणाचीच अपेक्षा नसते.
ते ओळखीचे, शेजारी,गाववाले, जातवाले असा विचार करून निर्णय लावतात.
जिंकलेले मोठे कलाकार म्हणून प्रसिद्ध पावतात.
आई-वडिलांच्या आत्म्याला शांती लाभते.
अलीकडे एस. एम. एस.करूनही कलावंतांना मोठं करण्याची सोय आहे.
कलावंत ओळखीच्यांना माझ्यासाठी एस. एम. एस. करा,अशा विनवण्या करतो.
अशा वेळेला समस्त काखा वर करणारे मदतीला धावतात, उपयोगी पडतात.
गुणांपेक्षा ओळख महत्त्वाची ठरते. खूप ओळख असलेला जिंकतो.
महान कलावंत ठरतो.महान व्हायचं तर ढोल बडवता आले पाहिजेत.
आपण ग्रेट आहोत अशी बोंब ठोकता आली पाहिजे.
ओळख असली तर बोंब ठोकणाऱ्यांपाशी गर्दी सहज गोळा होते.
ओळख असणाऱ्याने काही केलं नाही तरी गावा-गावांतून त्याचे कौतुक सोहळे साजरे केले जातात.
काही करणाऱ्यांना पाडणे आणि न करणाऱ्यांना पुजणे- अशी आपली पद्धत आहे. असो!
शेवटी ओळख नसणे हे सर्व मानवी दु:खांचं मूळ आहे, एवढं माझ्या लक्षात आलेलं आहे.
आता मी कुत्र्यांना बिस्किटं घालतो. त्यामुळे ते भुंकत नाहीत.
त्यांच्या पद्धतीने मुजरा करतात. गेटपर्यंत सोडायला येतात.
परवा मागच्या गल्लीतले एक समाजसेवक देशी प्यायले.
त्यामुळे त्यांना रस्ता व खड्डा यांत फरक करता आला नाही.
ते पडले व त्यांचा पाय मोडला. उद्या ते निवडून आले (येतीलच!)
आणि त्यांनी वर्तमानपत्र किंवा विद्यापीठ काढलं तर ओळख असावी असा विचार करून
मी त्यांना भेटायला गेलो.
त्यांचा पाय मोडलेला असल्यामुळे त्यांच्या पायावर पडता आलं नाही.
उद्या ते बरे झाले व त्यांना रस्ता-खड्डय़ातला फरक कळायला लागला
की पुन्हा भेटायला जायचं असं ठरवलं आहे.
हळूहळू ओळख वाढत चालली आहे.
समाजात वजनही वाढत चाललं आहे.
माझ्या एका मित्राचे नातेवाईक सरकारी हॉस्पिटलात अॅडमिट होते.
ओळख नसल्यामुळे ते अचानक गेले.
पटकन् बॉडी मिळावी म्हणून तरी काही ओळख काढता येईल का, असा मित्राचा फोन आला.
मी प्रयत्न करायचं ठरवलं.धावत हॉस्पिटलात पोहोचलो तेव्हा माझ्यासारखे अनेक तिथे जमलेले दिसले.
ते म्हणाले, 'सकाळपासून प्रयत्न सुरू आहेत. ओळख कमी पडते.बॉडी हलत नाही.'
'बॉडीसाठी ओळख कशाला?,' असं विचारल्यावर ते म्हणाले, 'भारतात एक वेळ जिवंत माणूस
ओळखीशिवाय देवाच्या दयेवर जगू शकेल, पण बॉडीसाठी ओळख लागतेच.'
पुन्हा धावाधाव सुरू झाली.वजनदार माणसाचा शोध सुरू झाला.
शरद पवारांना बालपणापासून ओळखणारे एक गृहस्थ येऊन गेले.
पण बॉडी इंचभरही हलली नाही. त्यावर, 'आता महाराष्ट्रात पवारांचं वजन उरलं नाही.
बॉडी दिल्लीत असती तर निव्वळ पवारांच्या नावानेच स्वत:हून पळत ती मुंबईच्या स्मशानात
गेली असती. कुणी अडवायची हिंमत केली नसती..' अशी चर्चा कानावर पडली.
त्याच हॉस्पिटलात एक खूप प्रामाणिक, शुद्ध चारित्र्याचे, नीतिमान गृहस्थ
नोकरी करतात असं कळलं.
थोडी ओळखही निघाली.त्यांच्याकडे जाऊन बॉडीची कैफियत मांडावी असं ठरवत होतो.
अनुभवी लोक म्हणाले, 'ते गृहस्थ भ्रष्ट नाहीत.त्यांना भ्रष्टाचार अजिबात खपत नाही.
 कुणाचं काम करणं,कुणाला मदत करणं म्हणजे भ्रष्टाचार करणं, असा समज
झाल्यामुळे ते काम करत नाहीत.
कुणाचंही काम होऊ देत नाहीत. लोक त्यांच्याकडे कामासाठी जात नाहीत.
फक्त आशीर्वादासाठी जातात.' बॉडीला आशीर्वादाची गरज नसल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही.
शेवटी हॉस्पिटलच्या मागच्या गल्लीत राहणाऱ्या आणि पाकीटमारीचा व्यवसाय करणाऱ्या एका कनवाळू दादाच्या ओळखीने बॉडी सुटली.
पुन्हा धावाधाव झाली. वॉर्डबॉय, आया-माया सर्व जमले.
खुशीनं काहीतरी द्या, म्हणाले. सर्वत्र आनंदी आनंद झाला.
सर्व झिम्मा- फुगडी खेळू लागले. असो! तर ओळखीचा महिमा मोठा आहे.
ओळखीशिवाय जन्म घेता येत नाही. मरताही येत नाही. ओळखीशिवाय आता सुटका नाही.
शेवटी ओळख असू द्या, ही विनंती.